Bollywood King Shah Rukh Khan has acted in many films so far. His upcoming film Pathan is currently in huge discussion 
मनोरंजन

प्रेक्षकांसाठी शाहरूख खानचं ‘अ‍ॅक्शन पॅक्ड’ सरप्राईज

Published by : Shweta Chavan-Zagade

बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांने आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. सध्याचा त्याचा आगामी चित्रपट पठाण (pathan movie) प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख हा मुख्य भूमिकेत दिसणार असून शाहरुखचा पठाण चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत सुत्रांकडून कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र शाहरुख खान त्याच्या चाहत्यांसाठी अ‍ॅक्शन पॅक्ड सरप्राईज घेऊन आला आहे. यामुळे प्रेक्षकवर्ग खूप आनंदात असल्याचे पाहायला मिळते.

शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांसाठी अ‍ॅक्शन पॅक्ड (Action packed) सरप्राईज दिले आहे ते म्हणजे त्यांची नुकतीच एक जाहिरात प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीमध्ये शाहरुखचा अ‍ॅक्शन अवतार म्हणजे यात शाहरुख हा एका हटके रुपात दिसत आहे. यामध्ये शाहरुखची वाढलेली दाढी आणि वाढलेले केस पाहायला मिळणार आहे. हे पाहून चाहते चांगलेच गोंधळात पडलेतं. तसेच या जाहिरातीमधील व्हिडिओमध्ये शाहरुख हा ट्रेनमध्ये जबरदस्त फाइटिंग करताना दिसत आहे. शाहरुख खानने त्याच्या जाहिरातीचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर (video social media viral) आकांऊडवर शेअर केला आहे.

शाहरुख खानने त्याच्या जाहिरातीचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया आकांऊडवर शेअर करत त्याने हटके स्टाईलमध्ये कॅप्शन दिले आहे. "तुम्ही नाव तर ऐकलंच असेल? याला 'सॉफ्ट' म्हणतं नाही, तुफान म्हणतात.., थम्स अप. 'सॉफ्ट ड्रिंक' नाही…तुफान",.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा