मनोरंजन

Shahrukh Khan Birthday : किंग खानचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?

Published by : Lokshahi News

बॉलिवूडच्या किंग खानचा आज ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. बाजीगर. किंग खान, किंग आफ राोमॅन्स, अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शहरूक खान. विविध चित्रपटातून राहुल, राज, डॉन अशा भूमिका साकारणाऱ्या किंग खानने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. भारतात आणि भारताबाहेर शाहरुखचा तुफान चाहतावर्ग आहे. पण तुम्हाला माहितीय का? शाहरुखचे खरे नाव हे वेगळेचे होते. फार पूर्वी त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बदलले.

'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, बाजीगर, डर, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दिल तो पागल है,
देवदास आशा विविध चित्रपटातून शाहरूकख खानने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत त्याच्या संवाद कौशल्यापासून ते अगदी दोन हात हवेत पसरवून त्याची 'सिग्नेचर' पोझ देण्यापर्यंतच्या त्याच्या अंदाजावर अनेकजण फिदा आहेत. शाहरुखचा अंदाज आणि त्याच्या डायलॉग्सची बॉलिवूडमध्ये खास ओळख आहे.
सुरूवातीला अभिनयाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या शाहरुखचा किंग खानपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. शाहरुखचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ साली झाला. त्याच्या जन्मानंतर शाहरुखच्या आजीने त्याचे नाव 'अब्दुल रेहमान' असे ठेवले होते. मात्र त्यानंतर काही वर्षांनी त्याच्या वडिलांनी नावात बदल केला. त्यावेळी त्याचे नाव 'शाहरुख' असे ठेवण्यात आले. लहानपणी तो फार हुशार विद्यार्थी होता. केवळ अभ्यासातच नाही तर हॉकी, फुटबॉलमध्येही अव्वल होता.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये शाहरुखच्या वडिलांचं कॅन्टीन होतं. एकेकाळी शाहरुखने थिएटरबाहेर तिकीटंही विकली होती. त्यातून मिळालेले ५० रुपये ही त्याची पहिली कमाई होती. अशी शहरूक चा प्रवास होता..

शाहरूखच्या 'मन्नत' ची खास गोष्ट
शाहरूखचा मन्नत हा बंगला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. या बंगल्याची गोष्ट हटके आणि खास आहे.  1997 मध्ये यस बॉस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पहिल्यांदाच शाहरूखने मन्नत बंगल्याला पाहिले. त्यावेळी शाहरूखने हा बंगला खरेदी करायचे ठरवले. त्यावेळी नरीमन दुबास यांचा  हे बंगल्याचे मालक होते. त्याचे नाव  व्हिला विएना असे होते.  2001 मध्ये शाहरूख व्हिला विएनाचे मालक नरीमन दुबास यांना भेटला. त्यानंतर तो बंगला त्याने खरेदी केला. शाहरूखने या बंगल्याचे नाव जन्नत ठेवण्याचा निर्णय घेतला. पण काही दिवसानंतर या बंगल्याचे नाव मन्नत असे ठेवण्यात आले. त्यावेळी 13.32 कोटी रूपयांना हा बंगला शाहरूखने खरेदी केला होता. आता या बंगल्याची किंमत 200 कोटी झाली आहे. हा बंगला 6 मजल्यांचा असून सी फेसिंग आहे. मन्नत बंगल्याचे इंटेरिअर शाहरूखची पत्नी गौरी खानने केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा