बॉलिवूडचा स्टार किंग शाहरुख खान कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. नुकताच शाहरुख खान अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नादरम्यान त्यांना भेट म्हणून दिलेल्या घरावरून चर्चेत आला होता. आता नुकताच शाहरुख खानच्या डोळ्याला दुखापत झालेल्याची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानच्या एका डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. शाहरुख खानला मोतीबिंदूचा त्रास सुरु आहे त्यादरम्यान त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शाहरुख खानच्या डोळ्यावर 29 जुलै रोजी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
तसेच बॉलिवूडचा किंग शाहरुख खान काही महिन्यापूर्वी किंग खानला उष्णाघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे शाहरुखला उपचारासाठी तातडीने अमेरिकेत जावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डोळ्यांच्या संबंधी त्रास जाणवत आहे. मुंबईत शाहरुख खानवर उपचार करण्यात आले. मात्र, काही अडचणी निर्माण झाल्याने आता शाहरुख खानवर अमेरिकेत तातडीने उपचार करण्यात येणार आहे. आजच शाहरुख हा अमेरिकेत रवाना होणार