मनोरंजन

शमिता शेट्टीचा बिग बॉस ओटीटीमध्ये खूलासा; वाचा सविस्तर

Published by : Lokshahi News

बिग बॉस ओटीटी हा शो नुकताच प्रदर्शित झाला. हा शो सुरु होऊन एक आठवडा देखील झालेला नाही तोवर बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये भांडणे व्हायला सुरू झाली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी देखील बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाली आहे. शोमध्ये शमिताने कोरिओग्राफर निशांत भट्ट विषयी धक्कादायक खुलासा केला.

१० ऑगस्ट रोजी प्रदर्शित भागामध्ये शमिता आणि दिव्या अग्रवाल एकत्र बसून बोलताना दिसत होत्या. शमिताने दिव्याला सांगितले की "एका शोमध्ये मला जाणवले होते की निशांतने त्याची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे मला थोडे विचित्र वाटत होते.पुढे शमिता म्हणाली की त्या घटनेविषयी मी बोलू इच्छित नाही. पण निशांतने माझ्यासोबत असताना एकदा मर्यादा ओलांडल्या होत्या आणि मला ते अजिबात आवडले नाही. मी त्याला म्हटले होते तू जे काही केले आहेस ते चुकीचे आहे. त्यानंतर आम्ही बोलणे बंद केले होते. दरम्यान शमिताने मला निशांतपासून लांब रहायला हवे कारण मला ती घटना पुन्हा आठवायची नाही" असे म्हटले.

निशांत हा बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. तर शमिता ही बिग बॉसच्या घरात दुसऱ्यांदाआली आहे. ती याआधी बिग बॉस सिझन ३मध्ये दिसली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा