मनोरंजन

“आई कुठे काय करते” मध्ये झळकणार शंतनू मोघे!

Published by : Lokshahi News

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' हि मालिका रोमांचक वळणावर आली आहे, मालिकेत आता अनिरुद्ध देशमुख चा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुख ची एन्ट्री होणार आहे, सुप्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे हि व्यक्तिरेखा साकारणार आहे.

या भूमेकेविषयी सांगताना शंतनू म्हणाला " 'आई कुठे काय करते' या मालिकेचा मी मोठा चाहता आहे, आमच्या घरात सर्वजन हि मालिका आवर्जून पाहतात. त्यामुळे या मालिकेत काम करायला मिळण हे मोठं भाग्य आहे अस मला वाटतं या मालिकेची टीम अतिशय भन्नाट आहे, या टीम मध्ये मी नवा जरी असलो तरी मला कुणी अस जाणवू दिल नाही. खूप प्रेमाने माझ स्वागत झालं. सुजाण कलाकार उत्कृष्ट संवादलेखन आणि ताकतीच दिग्दर्शन यामुळे मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नात्याची फसगत झाल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबाला मानसिक आधाराची गरज आहे. अविनाश कुटुंबाचा आधार होईल का? त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं वळण येणार हे पुढील भागांमधून स्पष्ट होणार आहे.


'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील 'छत्रपती शिवाजी महाराजां'ची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनू मोघे 'आई कुठे काय करते' या मालिकेत एंट्री घेणार आहेत. अविनाशच्या येण्याने देशमुखांच्या 'समृद्धी' बंगल्यात नव्या घडामोडी घडणार आहेत, तर या दरम्यान धमाल देखील पाहायला मिळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा