Sharad Upadhye 
मनोरंजन

Sharad Upadhye : '...आपल्या डोक्यात हवा गेली होती'; शरद उपाध्ये यांची निलेश साबळेवरील पोस्ट चर्चेत

लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Published by : Team Lokshahi

( Sharad Upadhye ) लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आता अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार असून या कार्यक्रमातून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

शरद उपाध्ये यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'आदरणीय नीलेशजी साबळे, आपल्याला *हवा येऊ द्या* च्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी 11 वा. पोहोचलो. पण 3 वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत.'

'मला रुम सोडू नका असे सांगीतले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट 4 वा. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला 6 वा. बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले.'

'पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा, साऱ्यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल.'

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'अभिजीत खांडकेकरही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.' असे शरद उपाध्ये म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'अभिजीत खांडकेकरही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.' असे शरद उपाध्ये म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा