Ranveer Singh Lokshahi Team
मनोरंजन

Ranveer Kapoor : पोस्ट शेअर करत रणवीरने पाहिली पत्नीच्या कमेंटची वाट...

बॉलिवूडच्या या क्यूट कपलचा सोशल मीडिया गेम नेहमीच चर्चित असतो.

Published by : prashantpawar1

रणवीर सिंग (Ranveer Singh)आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukon) सोशल मीडियावर काही ना काही कारणावरून चर्चित असतात. एकमेकांचे पाय ओढण्यापासून ते एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यापर्यंत रणवीर आणि दीपिका हे दोघेही मागे हटले नाहीत. बॉलिवूडच्या (Bollywood) या क्यूट कपलचा सोशल मीडिया गेम नेहमीच चर्चेत असतो. रणवीर आणि दीपिका पुन्हा एकदा मस्ती करत आहेत. रणवीरने नुकताच इन्स्टाग्रामवर (Instagram) स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर तो दीपिकाच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत होता. दीपिकाने या पोस्टवर कमेंट केली आहे. रणवीरने सोशल मीडियावर क्लासी लूकमध्ये त्याचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तो काळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रणवीरने लिहिले की मी माझ्या पत्नीच्या कमेंटची वाट पाहत आहे.

रणवीरच्या या पोस्टवर दीपिकाच्या कमेंटची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर दीपिकाने कमेंट केलीच आहे. दीपिकाने हार्ट इमोजी (Heart emoji) पोस्ट करत लिहिले आहे की लवकर माझ्याकडे ये. रणवीरचा मित्र अर्जुन कपूर (Arjun Kapoorया) नेही 'क्लीन अँड लीन' म्हणत त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

आता रणवीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग लवकरच बेअर ग्रिल्सच्या (Bear Grylls) शोमध्ये दिसणार आहे. हा शो 8 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रसारित होईल. या शोचा ट्रेलर रिलीज झाला असून आता त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय रणवीर जॅकलिन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandez) सर्कसमध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty ) दिग्दर्शित या चित्रपटात रॉकी आणि राणीची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ज्याचे दिग्दर्शन करण जोहर (Karan Johar) करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?