Ayan Mukharji Team Lokshahi
मनोरंजन

Ayan Mukharji : 'ब्रह्मास्त्र'च्या गाण्यामागचं सिक्रेट शेअर करत अयान म्हणाला...

लाईव्ह सत्रादरम्यान अनेक चाहत्यांनी अयान मुखर्जीला ब्रह्मास्त्रच्या इतर गाण्यांबद्दल प्रश्न विचारले असता अयानने आश्चर्यकारक उत्तर दिले.

Published by : prashantpawar1

हिंदी चित्रपटसृष्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ब्रह्मास्त्र सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhat) यांच्या या चित्रपटातील पहिलं केसरीया हे गाणं नुकतच रिलीज करण्यात आललं आहे. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचं हे गाणं रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukharji) यांनी सांगितले की चित्रपटात अजूनही काही गाणी बाकी आहेत. ज्याबद्दल रणबीर-आलियाला या दोघांना देखील माहिती नाही.

ब्रह्मास्त्रचे मोस्ट अवेटेड लव्ह अँथम गाणे 'केसरिया' हे रविवारी १७ जुलै रोजी रिलीज करण्यात आलं. हे गाणं रिलीज होण्यापूर्वी ब्रह्मास्त्र दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाच्या स्टार कास्ट रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत इंस्टाग्राम लाइव्ह सत्र केले होते. या लाईव्ह सत्रादरम्यान अनेक चाहत्यांनी अयान मुखर्जीला ब्रह्मास्त्रच्या इतर गाण्यांबद्दल प्रश्न विचारले असता अयानने आश्चर्यकारक उत्तर दिले.

अयान मुखर्जीने सांगितले की केसरिया हे गाणं इतक्या लवकर रिलीज करण्याची सध्या आमची तयारी नव्हती. मात्र प्रेक्षकांची मागणी आणि प्रेम पाहता हे गाणं लॉन्च करावं लागलं. आमच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील काही गाणी आहेत ज्याबद्दल रणबीर आणि आलियाला देखील माहिती नाही. हे ऐकून दोन्ही स्टार्सनाही काहीवेळा धक्का बसला असेल. नुकतच ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी सांगितले आहे की चित्रपटाची कथा खूप वेगळी आणि खास असणार आहे. काही दिवसांपूर्वी अयानने एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर सांगितले होते की पुराणांवर आधारित शस्त्रांची कथा आमच्या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा