Sherlyn Chopra Complaint Against Sajid Khan  
मनोरंजन

शर्लिन चोप्राकडून साजिद खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खरं तर, बिग बॉस 16 या लोकप्रिय शोमध्ये फिल्ममेकर साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून अभिनेत्री सातत्याने विरोध करत आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खरं तर, बिग बॉस 16 या लोकप्रिय शोमध्ये फिल्ममेकर साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून अभिनेत्री सातत्याने विरोध करत आहे. शर्लिनने काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात साजिद खानविरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अभिनेत्रीने शनिवारी पुन्हा मुंबईतील जुहू पोलीस ठाणे गाठले.

पोलिस स्टेशनबाहेर उपस्थित मीडियाशी संवाद साधताना शर्लिनने सांगितले की, ज्या पोलिस अधिकाऱ्याकडे तिची केस सोपवण्यात आली आहे तो सध्या हजर नाही. यादरम्यान रडत रडत शर्लिनने असेही सांगितले की, तिला निष्पक्ष तपास हवा आहे, पण जर पोलिसांना तिचे म्हणणे घ्यायचे नसेल तर ते स्पष्टपणे सांगू शकते.

शर्लिन म्हणाली की, जुहू पोलिसांनी माझे बयान नोंदवले आहे. साजिद खानची चौकशी केली जाईल आणि या संदर्भात बिग बॉसशी संपर्क साधला जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. तसेच एक आरोपी बिग बॉसच्या घरात असणे दुर्दैवी असल्याचे सांगितले. न्याय हवा असेल तर कारवाई झालीच पाहिजे.

वास्तविक, अभिनेत्रीने साजिद खानवर आरोप केला होता की, 2005 मध्ये तिने एका चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अभिनेत्रीला त्या ठिकाणी बोलावले आणि नंतर तिच्याशी आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या. अनेक वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेबाबत आता अभिनेत्री सतत आवाज उठवताना दिसत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे