मनोरंजन

Shilpa Shetty Ganpati Visarjan: ढोल-ताशाच्या तालावर बेभान नाचत शिल्पा शेट्टीने दिला बाप्पाला निरोप

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा गणपती विसर्जन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. शिल्पा शेट्टीने तिच्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी नाशिक ढोल पथकाला बोलावले होते.

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा गणपती विसर्जन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. शिल्पा शेट्टीने तिच्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी नाशिक ढोल पथकाला बोलावले होते. नाशिक ढोलच्या गजरात हा विसर्जन सोहळा अगदी थाटात पार पडलं. या ढोल ताशा पथकात पारंपारिक तालवाद्यांमध्ये पारंगत असलेल्या २१ प्रतिभावान महिलांचा सहभाग होता.

शिल्पा शेट्टी नेहमीच सगळे सण - उत्सव साजरे करताना दिसते. प्रत्येक उत्सव खास करण्यासाठी ती स्वतः हुन पुढाकार घेते. घरच्या बाप्पाला देखील तिने भक्तिभावाने निरोप दिला. शिल्पा शेट्टी नाशिक ढोलच्या तालावर बिनधास्त नाचत होती. तिच्या सोबत तिची बहीण सुष्मिता आणि मुलगा देखील होता.

शिल्पा शेट्टीने यावेळी मराठमोळा लूक केला होता. शिल्पा शेट्टीने सुंदर गुलाबी नऊवारी साडी नेसली होती आणि त्यावर साजेसा पिवळा ब्लाउज घातला होता. नाकात नाथ, कंबरेला कंबरपट्टा, केस फुलं देखील तिने माळली होती. अनवाणी जात तिने बाप्पाचं विसर्जन केलं आहे. तसेच तिच्या मुलाने देखील एक त्याच्या हाताने एक छोटी बाप्पाची मूर्ती तौर केली होती. ज्याचे विसर्जन त्याने त्याच्या मावशीच्या मदतीने केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य