8 जून 1975 मध्ये शिल्पा शेट्टीचा जन्म चेंबूर येथे झाला होता. वडिलांचे नाव सुरेंद्र व आईचे नाव सुनंदा आहे. त्यांची छोटी बहिण शमिता बॉलीवूड अभिनेत्री आहे. शिल्पाने सेंट एन्थोनी हायस्कुलमधून माध्यमिक शिक्षण तर पोद्दार कॉलेज माटुंगा मधून उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत व्हॉलीबॉल टीमची कॅप्टन होती. कराटेमध्ये तिच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे. जाणून घेऊया शिल्पा शेट्टीचा बॉलिबूड ते आजपर्यंचा प्रवास पाहूयात…
शिल्पा शेट्टी लोकप्रिय अभिनेत्री, प्रोडयुसर, मॉडेल आणि ब्रिटीश रियालिटी शो "बिग ब्रदर ५" ची विजेती आहे. बॉलिबूडमध्ये अभिनय आणि नृत्यासाठी विशेष ओळखली जाते. तेलगू, तमिळ, आणि कन्नड चित्रपटामध्ये तिने काम केले आहे. भारतातील सर्वात प्रसिध्द व्यक्तीमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव गणल्या जाते. किशोरावस्थेत शिल्पाने जाहिरातींसाठी मॉडेलिंग केले होते. तिने १९९३ मध्ये "बाजीगर" मधून अभिनयाची सुरुवात केली. यासाठी तिची उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून निवड झाली होती.
१९९४ मध्ये फिल्म "मैं खिलाड़ी तू अनाड़ी" साठी तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. साल २००० मध्ये "धडकन" चित्रपटाने तिचे करियर गतिमान केले. यासाठी तिचे अनेक अवार्डसाठी नामनिर्देशन झाले.परदेशी बाबू (१९९८) रिश्ते (२००२) आणि लाइफ इन….मेट्रो (२००७) अशा चित्रपटांना चांगले यश मिळाले. "फिर मिलेंगे" प्रेक्षकांनी फार पसंत केले. यासाठी बेस्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले. २००७ मध्ये ब्रिटीश रियालिटी शो "बिग ब्रदर सीजन 3" मध्ये विजेती ठरली.शिल्पा आणि अक्षय कुमार सोबतचे मैत्रीचे संबंध पुढच्या स्तरावर होते. मिडीयावर त्यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार केला होता. अक्षय त्यांच्या नात्याबाबत अधिक गंभीर होता. शिल्पासमोर अक्षयने 'लग्नानंतर ती चित्रपटांमध्ये काम न करता आपला परिवार सांभाळेल' अशी अट घातली होती. परंतु शिल्पाने त्याच्या मागणीला अस्वीकार करून आपले संबंध तोडले.शिल्पाने उद्योगपती आणि IPL क्रिकेट टीम राजस्तान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा सोबत २२ नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न केले. IPL मधील क्रिकेट टीम "राजस्तान रॉयल्स" ची ती सह-संस्थापक आहे. २०१२ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला आहे.