Shilpa Shetty  Team Lokshahi
मनोरंजन

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसाचे गिफ्ट पाहिले का? विश्वास नाही बसणार इतके...

तीच्या या गिफ्टचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) 8 जून रोजी तिचा 47 वा वाढदिवस साजरा केला. तीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीनीं तीला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शिल्पाने तिचा वाढदिवस खास बनवण्यासाठी स्वतःला एक महागडे गिफ्ट दिले आहे. तीच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

स्वतःची व्हॅनिटी व्हॅन भेट

शिल्पाने नुकतेच स्वतःला भेट म्हणून एक आलिशान व्हॅनिटी व्हॅन (Vanity van) दिली आहे. ही व्हॅनिटी व्हॅन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या आलिशान व्हॅनच्या आतील फोटो सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय बनली आहेत. फोटो पाहून लोक या व्हॅनिटी व्हॅनची तुलना आलिशान घराशी करत आहेत.

शिल्पाची नवीन व्हॅनिटी अत्याधुनिक

शिल्पा शेट्टीचे हे नवीन व्हॅन एका आलिशान घरापेक्षा कमी नाही. ज्यात एका आलिशान घरात उपलब्ध असतील त्या सर्व सुविधा या व्हॅनमध्ये आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये व्हॅनमध्ये एक छोटेसे स्वयंपाकघर दिसत आहे. यासोबतच व्हॅनिटीमध्ये हेअर वॉश स्टेशनही आहे. तंदुरुस्तीबाबत नेहमी गंभीर असणा-या शिल्पासाठी यात योगा डेक देखील आहे, ज्यामुळे ती शूट दरम्यान कधीही योगा करू शकते.

शिल्पा शेट्टी लवकरच 'निकम्मा' (Nikkama) या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) आणि शर्ली सेटियासोबत (Shirley Setia) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिल्पा शेट्टीने गेल्या वर्षी रिलीज झालेल्या हंगामा 2 (Humgama 2) मधून 15 वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर