Shilpa Shetty Team Lokshahi
मनोरंजन

Shilpa Shetty : सोशल मीडियावर व्हायरल होतोय शिल्पाचा 'हा' धमाकेदार लुक....

वेब सीरिजच्या सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)हिची अॅक्शन स्टाइल पहायला मिळत आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) सध्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजचं शूटिंग करत आहे. दरम्यान वेब सीरिजच्या सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)हिची अॅक्शन स्टाइल पहायला मिळत आहे. स्वत: शिल्पाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'भारतीय पोलिस दल'च्या शूटिंगशी संबंधित एक व्हिडिओ (BTS व्हिडिओ) शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी जोरदार अॅक्शन करताना दिसतेय.

व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. ती गुंडांना रॉडने मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा(Siddharth Malhotra) हा देखील अॅक्शन करताना दिसत आहे. सोशल मीडियावर शिल्पाला या लुकमध्ये पाहिल्यानंतर चाहते या मालिकेसाठी फारच उत्सुक झालेले आहेत. या मालिकेद्वारे शिल्पा पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवत नाही तर ती पहिल्यांदाच एका पोलिसाच्या भूमिकेतही पहायला मिळणार आहे.

अलीकडेच या मालिकेतील एक दमदार पोस्टर शेअर करताना रोहित शेट्टीने शिल्पा शेट्टीच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती दिली. हातात बंदूक घेऊन पोलिसाच्या भूमिकेत पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. ही एक मल्टिस्टारर वेब सीरिज असेल ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सिरीज Amazon Prime Video या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केले जाईल. गेल्या वर्षी 'हंगामा 2' या चित्रपटाद्वारे शिल्पाने प्रदीर्घ कालावधीनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले होते. त्याचबरोबर यावर्षी देखील ती 'निकम्मा' चित्रपटात दिसली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा