मनोरंजन

बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा येणार शिव ठाकरे आणि नेहा शितोळे

Published by : Lokshahi News

आजही बिग बॉसच्या घरात विकेण्डचा डाव रंगणार आहे. महेश मांजरेकर चावडीवर स्पर्धकांची शाळा घेणार आहेत. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर मीरा, गायत्री आणि आदिशची शाळा घेताना दिसून आले आहेत. घरात विविध टास्कसोबतच वादविवाद, भांडण, मतभेद, प्रेम प्रकरणं अशा अनेक गोष्ट दररोज घडत असतात. मात्र, याच शो मुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे.

अलिकडेच कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी २'चा विजेता शिव ठाकरे आणि नेहा शितोळे बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांची एण्ट्री पाहून घरातील स्पर्धकदेखील आश्चर्यचकित झाले असून घरात आनंदाचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, 'बिग बॉस मराठी ३' मध्ये शिव ठाकरे आणि नेहा शितोळे पुन्हा एकदा स्पर्धक म्हणून सहभागी होणार की केवळ गेस्ट म्हणून आले आहेत हे आजचा भाग पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना त्यामागील उलगडा होणार आहे. प्रेक्षकांना याबाबत खुप उत्सुकता लागली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा