Chetna Raj Lokshahi Team
मनोरंजन

धक्कादायक; वयाच्या 21व्या वर्षी अभिनेत्रीचे निधन

कन्नड टीव्ही चॅनलमध्ये करत होती काम

Published by : prashantpawar1

कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राज(Chetana Raj) यांचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन झाले. चेतना यांनी बंगळुरू येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिच्या मृत्यूचे कारण हे प्लास्टिक सर्जरी सांगण्यात येत आहे. त्यांना सोमवारी १६ मे रोजी 'फॅट फ्री' शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तब्यत अचानक बिघडू लागली. त्यांच्या फुफ्फुसात पाणी साचू लागले आणि अखेर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की अभिनेत्रीने या शस्त्रक्रियेबद्दल तिच्या पालकांना काहीही सांगितले नाही. ती तिच्या मैत्रिणींसोबत हॉस्पिटलमध्ये गेली. शस्त्रक्रियेनंतर संध्याकाळी तिला त्रास जाणवू लागला. तिच्या फुफ्फुसात पाणी भरले होते. त्यानंतर काही तासांनंतर अभिनेत्रीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला आहे.

हा सर्व प्रकार डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप चेतनाच्या पालकांनी केला आहे. चेतनाच्या पालकांना आपली मुलगी गमावल्याचे खूप दुःख होत आहे. शवविच्छेदनानंतर चेतना यांचा मृतदेह सध्या रामय्या रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. अभिनेत्रीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णालय समितीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. चेतना कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. 'गीता' आणि 'दोरेसानी' चेतनाच्या प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहेत

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा