झी टीव्ही या हिंदी वाहिनीवरील 'सा रे ग म प' या शोचा विजेता अखेर जाहीर झाला आहे. पाच महिने चाललेल्या या शोचे परीक्षक सचेत-परंपरा, गुरु रंधवा आणि सचिन-जिगर या गायकांनी केले. या शोची विजेती श्रध्दा मिश्रा झाली विजेती. आपल्या परीक्षकांची मार्गदर्शांने आणि तिच्या आवाजाने श्रद्धाने महाअंतिम फेरीमध्ये श्रद्धाने बाजी मारत हे विजेतेपद पटकावले.
श्रद्धा मिश्रा बनली 'सा रे ग म प' ची विजेती
या शोच्या महाअंतिम फेरीमध्ये उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांसह हरभजन सिंग यांनी हजेरी लावली होती. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी फिनालेमध्ये परफॉर्म केले. स्पर्धकांनी गायलेल्या गाण्यांवर क्रिकेटर्सही थिरकताना दिसले. अंतिम फेरीमध्ये ६ स्पर्धकांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली होती. सुभाषश्री देबनाथ आणि उज्ज्वल मोतीराम यांना पराभूत करून श्रध्दा मिश्राने 'सा रे ग म प' शोच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या हस्ते श्रद्धाला ट्रॉफी आणि १० लाखाचा चेक देण्यात बक्षिस म्हणून देण्यात आला.
श्रद्धाने आनंद व्यक्त केला
ट्रॉफी जिंकल्यानंतर श्रद्धा म्हणाली की, माझ्यासाठी हा एक स्वप्नपूर्तीचा अनुभव होता.... माझा 'सा रे ग म प'चा प्रवास खूपच अप्रतिम होता, मी इथे राहूनच खूप काही शिकाले... मार्गदर्शांनी खूप काही गोष्टी शिकवल्या.... मी इथपर्यंत येईन त्यांची अपेक्षा मला नव्हती, तसेत आता गाण्याला माझे करियअर म्हणून पाहात आहे.... हा प्रवास छान करण्यासाठी मी सर्वाचे आभार मानते.... सचिन-जिगर सरांसोबत माझे पहिले ओरिजिनल 'धोकेबाज' ही मी रेकॉर्ड केले आहे, असं म्हणत श्रद्धा वक्तव्य झाली आहे.