Siddhant Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Shraddha Kapoor Brother : ड्रग्ज प्रकरणी श्रद्धाचा भाऊ अटकेत....

एका हॉटेलमध्ये पार्टी दरम्यान पोलिसांनी छापा टाकला....

Published by : prashantpawar1

पुन्हा एकदा बॉलिवूडने ड्रग्ज प्रकरणावर आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक सेलेब्सची नावे समोर आली होती. सध्या अनेक सेलेब्सच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे कारण आता या यादीत आणखी एक नाव समोर आले आहे. बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shradha Kapoor) हिचा भाऊ सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) याला पोलिसांनी बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. सिद्धांतवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला जिथून सिद्धांतला ताब्यात घेण्यात आले आहे. बंगळुरू पोलिसांनी रविवारी रात्री एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकला होता. जिथे हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टी होत होती. या पार्टीत 35 जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 6 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून यामध्ये सहा लोकांचा समावेश आहे. डॉ भीमाशंकर एस गुलेद, डीएसपी, बेंगळुरू शहर, पूर्व विभाग यांनी सांगितले की सिद्धांत कपूरची ड्रग्सची चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्याला उलसूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.

उल्सूर पोलिसांनी रात्री 12 वाजेच्या दरम्यान हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात 50 हून अधिक तरुण-तरुणींना अटक करण्यात आली असून त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. यात शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांची मुलगी श्रद्धा कपूर ही देखील आहे. याप्रकरणी एनसीबीने श्रद्धा कपूरचीही चौकशी केली होती. सिद्धांत कपूरबद्दल बोलायचे झाले तर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यात त्याला यश आलेलं नाही. त्याने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे. सिद्धांतने त्याची बहीण श्रद्धासोबतही चित्रपटात काम केले आहे. पण तोही चित्रपट फ्लॉप ठरला. सिद्धांत अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसोबत 'चेहरे' या चित्रपटात दिसला होता परंतु त्याचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा