अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण इंदूरमध्ये नोंदणीकृत असलेल्या सोसायटीतील 50 लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेलेल्या कंपनीच्या प्रमोशनशी संबंधित आहे. इंदूरमध्ये एका कंपनीत गुंतवणूक करण्याच्या जाहीरातीत या दोघांनी काम केलं होतं.
त्यात दोघांनी गुंतवणूक करण्याच आव्हान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 316, 318 आणि 318(4) अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. हा एफआयआर हरियाणातील सोनीपतमध्ये नोंदवण्यात आला आहे.
गुंतवणुकीचं आवाहन करत कंपनीची जाहीरात केल्याचा आरोप श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर लावण्यात आला आहे. 22 जानेवारी 2025 रोजी नोंदवण्यात आलेल्या या प्रकरणात 13 आरोपींची नावे आहेत, ज्यात या दोन अभिनेत्यांचा समावेश आहे.