Aapdi Thapdi Team Lokshahi
मनोरंजन

श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे खेळणार 'आपडी-थापडी'चा खेळ

चित्रपटाचं पोस्टर लाँच, दसऱ्याला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : shamal ghanekar

मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत 'आपडी थापडी' ('Aapdi Thapdi) या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.चित्रपटाचं छायांकन सुमन साहू यांचे आहे. चित्रपटाचं पोस्टर फील गुड असल्याने "फॅमिली चा चित्रपट बघा फॅमिली बरोबर" अशी टॅग लाईन असल्याने हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि सहकुटुंब पाहता येईल यात शंका नाही .

Aapdi Thapdi

श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि चित्रपटांतून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं. "बाजी" आणि "पोस्टर बॉईज"या चित्रपटानंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी सशक्त अभिनेत्री असल्यानं आपडी-थापडी नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना दसऱ्याची प्रतीक्षा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी