मनोरंजन

मी क्लिनीकली डेड झालो होतो; श्रेयस तळपदेने सांगितला हार्ट अटॅकचा अनुभव

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Shreyas Talpade on Heart Attack : बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेसाठी २०२३ हे वर्ष कठीण गेले आहे. 14 डिसेंबर रोजी श्रेयसला हार्ट अटॅक आल्याने त्याच्यावर अँजिओप्लास्टी झाली. श्रेयसच्या हार्ट अटॅकचे वृत्त ऐकून त्याचे चाहते खूपच अस्वस्थ झाले होते. आता श्रेयसची प्रकृती सुधारली आहे आणि त्याने हार्ट अटॅक भयानक अनुभव सांगितला.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला की, मला यापुर्वी कधीही रुग्णालयात दाखल केले गेले नाही. अगदी फ्रॅक्चरपर्यंत नाही. मी हे कधीच पाहिले नव्हते. तुमचे आयुष्य कधीही हलक्यात घेऊ नका. जीवन असेल तर जग आहे. अशा प्रकारच्या अनुभवामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी वयाच्या 16 व्या वर्षी थिएटर करायला सुरुवात केली आणि वयाच्या 20 व्या वर्षी व्यावसायिक अभिनेता बनलो. गेल्या २८ वर्षांपासून मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. आम्ही आमच्या कुटुंबाला गृहीत धरतो. आम्हाला वाटते की आमच्याकडे अजून वेळ आहे.

तो पुढे म्हणाला, मी क्लिनीकली डेड झालो होतो. माझे पुनरागमन जादूपेक्षा कमी नव्हते. मी माझ्या डॉक्टर आणि पत्नी दीप्तीचे आभार मानतो, असेही त्याने म्हंटले. मी गेल्या अडीच वर्षांपासून नॉनस्टॉप काम करत आहे आणि माझ्या चित्रपटांसाठी सातत्याने ट्रॅव्हल करत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मला खूप थकवा जाणवत होता. थोडं वेगळं होतं पण मी नॉनस्टॉप काम करत होतो. माझी बॉडी चेकअप झाले. मी ईसीजी, 2D इको, सोनोग्राफी आणि रक्त तपासणी करून घेतली. माझे कोलेस्ट्रॉल खूप जास्त होते आणि मी त्यासाठी औषधे घेत होतो. माझ्या कुटुंबात हार्ट प्रॉब्लेमची हिस्ट्री आहे. त्यामुळे मी खबरदारी घेत होतो, असे त्याने सांगितले.

श्रेयसने म्हंटले की, मी आगामी चित्रपट वेलकम टू जंगलचे शूटिंग करत आहे. आम्ही आर्मी ट्रेनिंग शूट करत होतो. जसे लटकणे आणि पाण्यात उडी मारणे इत्यादी. अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि माझा डावा हात दुखू लागला. मी जेमतेम माझ्या व्हॅनिटीकडे गेलो आणि माझे कपडे बदलले. मला वाटले की हे अ‍ॅक्शन सिक्वेन्समुळे दुखत आहे. असा थकवा मला कधीच जाणवला नव्हता. घरी जाण्यासाठी गाडीत बसताच सरळ दवाखान्यात जावे असे वाटले. पण आधी घरी जावे असे वाटले. माझी पत्नी दीप्तीने मला अशा अवस्थेत पाहिल्यावर 10 मिनिटांतच आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. आम्ही हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचलो पण प्रवेशद्वारावर बॅरिकेड असल्याने आम्हाला यू-टर्न घ्यावा लागला.

पुढच्याच सेकंदाला माझा चेहरा पिवळा पडला आणि माझ्या हृदयाचे ठोके बंद झाले. हा कार्डियक अरेस्ट होता. माझ्या हृदयाचे ठोके काही मिनिटांसाठी थांबले. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे दीप्तीला कारच्या दरवाजामधून बाहेर पडणे शक्य नव्हते, म्हणून ती माझ्या बाजूने बाहेर आली आणि लोकांना मदतीसाठी बोलावले. काही लोक मदतीला आले आणि मला आत घेऊन गेले. त्यानंतर डॉक्टरांनी सीपीआर आणि इलेक्ट्रिक शॉक दिला आणि त्यानंतर मी पुन्हा जिवंत आलो, असा अनुभव श्रेयस तळपदेने सांगितला आहे.

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

Hoarding Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक