Siddhant Veer Suryavanshi Team Lokshahi
मनोरंजन

Siddhant Veer Suryavanshi: सिद्धांत सूर्यवंशी यांचा व्यायामादरम्यान मृत्यू

टेलिव्हिजन जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे.

Published by : shweta walge

टेलिव्हिजन जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायाम करताना सिद्धांतचा मृत्यू झाला. अभिनेता फक्त 46 वर्षांचा होता आणि इंडस्ट्रीत चांगले काम करत होता.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धांत सकाळी वर्कआउट करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांच्या पथकाने सुमारे 45 मिनिटे सिद्धांतवर उपचार केले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. तो 15 डिसेंबरला त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करणार होता.

या मालिकांमध्ये काम केले आहे

सिद्धांत वीर सूर्यवंशी हा एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता होता. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर त्याने टीव्हीमध्ये पाऊल ठेवले. त्याची पहिली टीव्ही मालिका 'कुसुम' होती. यानंतर सिद्धांत अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये दिसला, ज्यामध्ये तो 'कसौटी जिंदगी की', 'कृष्णा अर्जुन', 'क्या दिल में है' सारख्या मालिकांमध्ये दिसला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा