मनोरंजन

सिद्धूचा डान्स पाहून रणवीर सिंग फिदा कमेंट करत म्हणाला…

Published by : Lokshahi News

काही दिवसांपासून 'झोंबिवली' हा मराठी चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत . या चित्रपटात 'झोम्बी' आणि त्याविषयी कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात असलेले कलाकार सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करत चाहत्यांना या चित्रपटाविषयी काही हिंट देताना किंवा मग यातल्या गाण्यावर त्यांचा डान्स शेअर करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ वैदेही परशुरामीने शेअर केला आहे .

वैदेहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वैदेही, सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ दिसत आहेत. या व्हिडीओत ते 'झोंबिवली' या गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत मित्रांनो चला, "आता मिळून एकदम क्रेझीवाला 'झोंबिवली' डान्स करूया" असं कॅप्शन तिने दिलं आहे. . वैदेहीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंगने या पोस्टवर कमेंट केली आहे. रणवीरला सिद्धार्थचा डान्स आवडल्याचे दिसत आहे. त्याने "सिद्धू बाबा के जलवे" अशी कमेंट केली आहे. त्यावर उत्तर देत सिद्धार्थनेही "रणवीर दादा के जलवे ही जलवे" असे म्हटले आहे .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच