Navya Naveli Nanda & Siddhant Chaturvedi  Team Lokshahi
मनोरंजन

बिंग बींच्या नातीला डेट करतोय सिद्धांत चतुर्वेदी? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही एका अभिनेत्याला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

Published by : Team Lokshahi

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) फिल्मी विश्वापासून दूर असली तरी ती कुणाही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. नव्या सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. परंतु नव्या आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिला डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून गाजत आहेत. 

या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) हँडलवर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटोज पाहिल्यानंतर या दोघांचे अफेअर असल्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.नव्याच्या एका पोस्टवर सिद्धांतने खास कमेंट केली आहे, त्यानंतर त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

Navya Naveli Nanda & Siddhant Chaturvedi

सिध्दार्थने त्याच्या सुट्टीतील फोटो आणि व्हिडिओ (video) शेअर करत आहे जिथे तो जवळचा मित्र आणि अफवा असलेली गर्लफ्रेंड (Girlfriend) नव्या सोबत दिसत आहे. मंगळवारी सिद्धांतने एक फोटो शेअर केले ज्यामध्ये तो टेकडीवर एका बाकावर बसलेला दिसत आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "कुठेतरी डोंगरमाथ्यावर एक बेंच आहे, आमच्या म्हातारपणाच्या संभाषणांची वाट पाहत आहे." यावर प्रतिक्रिया देत नव्याने सन फेस इमोजी टाकला आहे.

Navya Naveli Nanda & Siddhant Chaturvedi

बुधवारी नव्याने इंस्टाग्रामवर दोन फोटोंचा एक सेट शेअर केला आणि तिने कॅप्शनमध्ये जे लिहिले आहे ते पाहता, असे दिसते की हे फोटो गली बॉय स्टार सिध्दार्थने क्लिक केले आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिले, हा फोटो कुण्यातरी वेगळ्या गुढ व्याक्तीने काढल्याचा इमोजी टाकला आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सिद्धांतने सांगितले होते की, तो सिंगल नाही. तो कुणाला तरी डेट करत असून ती व्यक्ती सिनेमा इंडस्ट्रीशी निगडीत असली तरी ती अभिनेत्री नाही. सिद्धांतने मुलाखतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी नव्याशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यामुळे आता हे दोघेजण खरोखरच रिलेशनमध्ये आहेत की नाही, याचा खुलासा त्यांच्याकडूनच होणार आहे. ते प्रेमात असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा