मनोरंजन

Sidhu Moose Wala: सिद्ध मूसेवालाच्या घरी पाळणा हलणार! दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई देणार बाळाला जन्म

सिद्धू मुसेवाला याच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून, लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

Published by : Team Lokshahi

सिद्धू मुसेवाला याची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र आता सिद्धू मुसेवाला याच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून, लवकरच बाळाला जन्म देणार आहे. सिद्धू मूसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवाला याची २०२२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सिद्धू मुसेवालाची आई एका खास तंत्राच्या मदतीने या मुलाला जन्म देणार आहे. आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर यांची गर्भधारणा केल्याचे बोलले जात आहे. येत्या मार्च महिन्यात सिद्धू मुसेवालाची आई या बाळाला जन्म देणार आहे.

सिद्धू मुसेवाला याच्या काकांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी त्याच्या पालकांनी मात्र या वृत्तावर अद्याप मौन बाळगले आहे. नव्याने जगात येणाऱ्या बाळाची सुरक्षा हे यामागचे मोठे कारण असू शकते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा