बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्च 2025 रोजी प्रदर्शित झाला. गेल्या वर्षी 'सिंकदर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाची चर्चा सुरु होती. या चित्रपटामध्ये प्रथमच रश्मिका मंदाना आणि सलमान खान यांची जोडी पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटामध्ये सलमान खान संजय राजकोट नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. ए. आर. मुरुगदॉस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. रमानजानचे औचित्य साधून सलमान खानचा या वर्षातला पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये सलमान खान ॲक्शन सीन्स पाहायला मिळत आहे. ट्रेलर पहिल्यापासून शेवटपर्यंत खेळवत ठेवले आहे . नेटकऱ्यांनी या ट्रेलरला लाइक कमेंट केल्या आहेत. या कमेंट्समध्ये नेटकरी लिहितो की, "प्रेक्षकांना भाईजानचे नवीन व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहे." तर दुसरा नेटकरी लिहितो की, "माशल्लाहा सलमान भाईने काहीतरी वेगळे दाखवले जाणार आहे." तिसरा नेटकरी लिहितो की, "भाई की झलक सबसे अलग", असे लिहित नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान सिंकदर चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदॉस यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना यांच्यासोबतच काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर असे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 'बाहुबली' चित्रपटामधील कटप्पाची भूमिका साकरलेले अभिनेते सत्यराज खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.