Singer KK Death  Team Lokshahi
मनोरंजन

Singer KK Death : सुप्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

संगीत कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका

Published by : Shweta Chavan-Zagade

सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत्त (Krishnakumar Kunnath) उर्फ केके यांचे मंगळवारी कोलकाता येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन. ते ५३ वर्षांचे होते. परफॉर्मन्सदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मंगळवारी (31 मे) कोलकाता येथील नझरूल मंच येथे केके यांचा गाण्याचा कार्यक्रम होता. परफॉमन्स संपल्यावर केके यांना कार्यक्रमस्थळीच हृदय विकाराचा झटका आला. त्यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CMRI) येथे नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले. केके यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

23 ​​ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांना केके म्हणूनच जास्त ओळखलं जायचं. दिल्ली येथे एका मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या केके यांचं शिक्षण सेंट मेरी शाळेत झालं. लहानपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या केके यांनी काही काळ एका हॉटेल मध्ये नोकरी देखील केली. सोबत गायनाचा छंद देखील जोपासला. याच छंदाचं रूपांतर पुढे करियरमध्ये केलं. दिल्लीहुन मुंबईला आल्यावर लेस्ली लुईस, रणजित बारोट यांच्याकडे त्यांनी गायनाची ऑडिशन दिली. त्यांनी केके यांना जाहिरातीसाठी जिंगल्स गाण्याची संधी दिली.

जवळपास ३५०० जिंगल्स गायल्या नंतर त्यांना सिनेमात गाण्याची संधी मिळाली. लेस्ली लुईस यांना तेव्हापासून ते आपला गुरु मानायचे. पुढे ए आर रहमान पासून ते प्रीतम अशा विविध स्टाईलच्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं. स्क्रीनपासून अनेक अवॉर्ड त्यांना मिळाला होता.

केके यांनी हिंदीत जवळपास २०० हून अधिक गाणी गायली आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप...’ गाण्याने त्यांना बाॅलीवूडमध्ये ओळख मिळवून दिली होती. त्यांचा ‘पल’ म्युझिक अल्बम गाजला होता. (singer kk songs) ओम शांती ओम, गँगस्टर, दस अशा अनेक सिनेमासाठी त्यांनी गाणी गायली आहेत. फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

केके यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गायक अदनान सामी यांनी केके यांचं निधन वेदनादायी असल्याचं म्हटलंय. तर राहुल वैद्य याने ट्विटमध्ये म्हटलंय, केके यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच समजलं. देवा, हे काय सुरूये. केके सर चांगले व्यक्ती होते. ५३ वर्षीचं त्याचे निधन होणं हे धक्कादायक आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रात्री उशिरा ट्विट करून केके यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, "प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले, जे के.के. त्याच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांमध्‍ये विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती"

तर केके यांची सहकारी गायिका श्रेया घोषाल यांनी देखील ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या म्हणतात, केके चं अकाली जाणं मी अजूनही पचवू शकलेले नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा