SMRITI IRANI AT DAVOS 2026: THREE YEARS OF ALLIANCE FOR GENDER EQUITY TRANSFORMING GLOBAL IMPACT 
मनोरंजन

Smriti Irani: डावोस 2026 मध्ये भारताचा आवाज, स्मृती इराणीच्या ग्लोबल अलायन्सद्वारे जेंडर इक्विटीचा जागतिक प्रभाव

Women Empowerment: स्मृती इराणी यांनी डावोस 2026 मध्ये जेंडर इक्विटीवर भारताचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला.

Published by : Dhanshree Shintre

२५ वर्षांनंतर क्यूँकीच्या नव्या अवतारासह भारतीय दूरचित्रवाणीवर ऐतिहासिक पुनरागमन करत असतानाच, माजी केंद्रीय मंत्री तसेच Alliance for Global Good: Gender Equity & Equality यांच्या संस्थापक आणि अध्यक्षा स्मृती इराणी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आठवडा, डावोस 2026 मध्ये WE Lead Lounge येथे जागतिक पातळीवर आपली प्रभावी उपस्थिती नोंदवली. या निमित्ताने त्यांच्या अलायन्सला तीन वर्षे पूर्ण झाली असून, जागतिक वचनबद्धतेचे अर्थपूर्ण आणि मोजता येतील अशा पातळीवरील (grassroots) परिणामांत रूपांतर कसे होत आहे, याचा ठोस संदेश त्यांनी दिला.

मनोरंजन, सार्वजनिक जीवन आणि जागतिक व्यासपीठ—या तिन्ही क्षेत्रांत स्मृती इराणी आजही भारतातील सर्वात प्रभावी आणि दूरवर परिणाम घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. दूरचित्रवाणीपासून धोरणनिर्मितीपर्यंतचा त्यांचा प्रवास बहुआयामी आणि प्रेरणादायी आहे. क्यूँकी 2.0 मधील त्यांचे पुनरागमन हे केवळ कमबॅक नव्हते, तर लोकप्रिय संस्कृती आणि नेतृत्व यांमधील त्यांची सहज आणि प्रभावी वाटचाल पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ऐतिहासिक क्षण ठरला.

याच क्षमतेचे प्रतिबिंब डावोस 2026 मधील त्यांच्या कार्यातून दिसून आले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी त्यांनी जागतिक नेते, धोरणकर्ते आणि बदल घडवणाऱ्या व्यक्तींशी सखोल संवाद साधला. “Strategic Leadership in the Bio-Revolution: Women Powering Innovation and Global Solutions” या सत्रात बोलताना त्यांनी जागतिक बायो-रिव्होल्यूशन हे पुराव्यावर आधारित धोरणे आणि समतोल सहभाग यावर आधारित असणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला.

या सर्व सहभागांचे क्षण त्यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले, ज्यातून डावोस 2026 मधील पहिल्या दिवसाचा त्यांच्या प्रभावी उपस्थितीचा आढावा मिळतो. दिवसातील एक महत्त्वाचा ठळक क्षण म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. नारा चंद्राबाबू नायडू यांच्याशी झालेली त्यांची भेट. मुख्यमंत्र्यांनी अलायन्सच्या दूरदृष्टीचे कौतुक करत राज्य सरकारसोबत सहकार्य करण्याचे निमंत्रण दिले. प्रस्तावित भागीदारीद्वारे सुमारे पाच लाख महिलांना सक्षम करण्याचा मानस असून, महिला-नेतृत्वाखालील उद्योग आणि स्वयं-सहायता गटांना बळकटी देत जागतिक वचनबद्धतेचे थेट आणि मोजता येतील अशा कृतीत रूपांतर करण्याचा उद्देश आहे.

या संवादातून महिला उद्योजकता, कौशल्यविकास आणि नवोन्मेषात दीर्घकालीन गुंतवणूक ही शाश्वत व सर्वसमावेशक विकासासाठी किती महत्त्वाची आहे, यावर दोन्ही बाजूंनी ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा