Radhika Aapte Team Lokshahi
मनोरंजन

Radhika Aapte : लग्नासंबंधित राधिकाच्या काही गोष्टी उघड...

तिने तिच्या लग्नाबद्दलचा हा खुलासा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

Published by : prashantpawar1

आपल्या आगळ्या वेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून मल्याळम, तेलुगू, बंगाली, तमिळ, मराठी, इंग्रजी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या राधिका आपटे (Radhika Aapte) हिने चित्रपटांच्या दुनियेत स्वतःला खूप वेगाने सिद्ध केलेलं आहे. राधिकाने 'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 'शोर इन सिटी' या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळाली. ७ सप्टेंबर १९८५ रोजी जन्मलेली राधिका आपटे हिला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. मात्र चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने ब्रेक घेतला व लंडनमध्ये नृत्य शिकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने तिच्या आयुष्यात त्याचा सोबती आला.

खरं तर राधिका आपटेची लंडनमध्ये संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी भेट झाली. दोघेही एकमेकांना प्रेमात पडण्यापासून रोखू शकले नाहीत. अखेर 2012 मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केले. परंतु तिने 2013 मध्ये तिच्या लग्नाबद्दलचा हा खुलासा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. राधिका आपटे हिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक अशा उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चाहत्यांना तिच्या अभिनयाबद्दल खूप वेड आहे. पार्च्ड, लस्ट स्टोरी, कबाली, बदलापूर, अंधाधुन आणि पॅडमॅन या चित्रपटांतल्या तिच्या अभिनयाच खूप कौतुक देखील तेवढ्याच प्रमाणात झालं. यासोबतच तिची गणना अशा अभिनेत्रींमध्ये केली गेली ज्या प्रत्येक विषयावर मोकळेपणाने बोलतात. विक्रम वेधा, 'मिसेस अंडरकव्हर' आणि 'मोनिका' हे राधिका आपटेचे आगामी चित्रपट आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा