Sanjay Datt Team Lokshahi
मनोरंजन

Sanjay Datt : मान्यता जीवनात येताच संजयसोबत घडलं असं काही...

मान्यता त्याच्या जीवनात आल्यानंतर संजयने मान्यताला डेट करायला सुरुवात केली होती.

Published by : prashantpawar1

बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये अनेक जोडपे प्रसिद्ध आहेत. या सर्व जोड्यांमध्ये एक सुंदर जोडी आहे ती म्हणजे अभिनेता संजय दत्त (Sanjay Datt) आणि मान्यता दत्त (Manyata Datt) यांची. मान्यता दत्तने संजयला त्याच्या प्रत्येक चढ-उतारात साथ दिली आहे. यासोबतच तिने संजय दत्तला प्रत्येक कठीण प्रसंगी एकटे सोडले नाही. हे पाहून संजय दत्त प्रभावित झाला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. संजय दत्त आणि मान्यता यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली. त्यादरम्यान संजय दत्त नादिया दुर्रानीला डेट करत होता. मात्र मान्यता त्याच्या जीवनात आल्यानंतर संजयने मान्यताला डेट करायला सुरुवात केली होती. दोघांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केलं आणि 2008 मध्ये दोघांचं लग्न देखील झालं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मान्यता दत्त नेहमीच संजयची खूप काळजी घ्यायची अन् आजही ती अगदी त्याच प्रमाणे त्याची काळजी घेते. संजू बाबासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायला त्यांना खूप आवडायचं. इतकंच नव्हे तर ती अनेकदा चित्रपटांच्या सेटवर त्याच्या आवडीचे जेवण बनवत असे. यासोबतच ती प्रत्येक छोट्या गोष्टीची मनापासून काळजी घेत असे. मान्यता ज्या पद्धतीने संजय दत्तची काळजी घेत असे बहुधा एवढी काळजी कोणीही घेतली नसेल. यामुळेच संजू बाबाने मान्यताला आपला साथीदार बनवले.

मान्यता आणि संजय दत्त जवळपास 14 वर्षांपासून वैवाहिक जीवन जगत आहेत. दोघेही इकरा नावाच्या मुलीचे आणि शाहरान नावाच्या मुलाचे पालक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या KGF 2 या चित्रपटात संजय दत्तने आपल्या अभिनयाची चांगलीच ताकद दाखवली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'शमशेरा' या चित्रपटात तो त्याच्या अभिनयाचा चमत्कार करताना दिसणार आहे. शमशेरा चित्रपटातील त्याच्या लूकची खूप चर्चा होत आहे. त्याचा लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या