मनोरंजन

अखेर ‘अप्सरा’ कुणाल बेनोडेकरसोबत विवाह बंधनात!

Published by : Lokshahi News

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अर्थात सोनाली कुलकर्णी अखेर विवाह बंधनात अडकली आहे. या विवाह सोहळ्याचे फोटो सोनालीने आपल्या फेसबुकवर शेअर करत पोस्ट लिहली आहे.


अब से हम '7' 'मे' म्हणत सोनालीने लिहिले आहे की, आम्ही जुनमध्ये युकेला लग्न करणार होतो. मात्र, युकेत आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख पुढे करावी लागली, मग विवाहस्थळाच्या तारखा अनुसार जुलै मधली तारीख ठरली. लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शुटींग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. मी पुन्हा एकदा दुबईत अडकले. एप्रिलमध्ये युकेने भारतीयांसाठी प्रवासावर बंदी जाहीर केली. जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. सोबतच एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ रद्द करायचा निर्णय घेतला.


सोनाली पुढे म्हणाली की, जुनचे जुलै होतंय, म्हणलं पोस्टपोन करायच्या ऐवजी जुलैचं मे मध्ये करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून 'लग्न' जास्त महत्वाचं आहे ना की 'समारंभ'.आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलाही सोहळा करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही. आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही. आताच शिक्का मोरतब करून टाकू.दोन दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि 15 मिनिटांमध्ये 4 लोकांच्या साक्षीने मंदिरात, वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या 3 गोष्टी करून विवाह नोंदणीवर स्वाक्षरी केली.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार