मनोरंजन

सोनाली कुलकर्णी झळकणार मल्याळम चित्रपटात; मलाइकोट्टाई वालिबान' मधील लूक आला समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Published by : Siddhi Naringrekar

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला असून या फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळत आहे. आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार असून महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता सोनाली दक्षिणात्य चित्रपटात गाजवणार आहे.

या चित्रपटाबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, '' हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे.''

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा