Sonalee Kulkarni Team Lokshahi
मनोरंजन

Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची अप्सरा पुन्हा बांधणार लग्नगाठ

7 मे रोजी त्यांच्या लग्नाला एक वर्षे पूर्ण होत असल्याने ही जोडी पुन्हा धुमधडाक्यात बांधणार लग्नगाठ

Published by : Akash Kukade

महाराष्ट्राची अप्सरा असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) 7 मे 2021 मध्ये कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान कुणाल बेनोडेकरशी ( Kunal Benodekar) परदेशात लग्नगाठ बांधली होती.

कोविड काळात सोनालीने अत्यंत साधेपणाने घरच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं होतं. सोशल मीडियावर (Social Media) फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली होती. यंदा 7 मे रोजी त्यांच्या लग्नाला एक वर्षे पूर्ण होत असल्याने ही जोडी पुन्हा धुमधडाक्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे समोर आले आहे.

सोनालीने 7 मे रोजी दुबईमध्ये (Dubai) कुणालशी लॉकडाऊनमध्ये लग्न केले होते. कोरोना असल्यामुळे तिला लग्नासाठी तिचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित करता आले नाही. म्हणूनच सोनाली आता तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला तिचे कुटुंबीय, मित्र आणि सहकारी यांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न करणार असल्याची चर्चा आहे. हे लग्न लंडनमध्ये 7 मे रोजी होणार असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

सोनाली सध्या मुंबईत (Mumbai) असून लवकरच ती लंडनला रवाना होणार आहे. हे जोडपे सध्या त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे आणि त्यांच्या भव्य विवाह सोहळ्यासाठी तयारी करत आहेत. ते लवकरच त्यांच्या चाहत्यांना याबद्दल माहिती देणार असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. यावर सोनाली कुलकर्णीने अजून खुलासा केला नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा