Sonam Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Sonam Kapoor : कुणी तरी येणार गं! सोनमचे डोहाळे जेवण थाटात

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्या डोहाळे जेवणाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिच्या डोहाळे जेवणाची सोशल मिडियावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे. सोनमच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी या फोटोंना लाईक आणि कमेंट्सकडून शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. सोनमची बहिण रियाने या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे काही खास क्षणांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. सोनमने डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

सोनमची बहिण रियाने (Rhea Kapoor) डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिच्या आठवणीत राहावा म्हणून विशेष तयारी केली होती. सोनमच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये Leo Kalyan या गायकाने सोनमचं हिट गाणं मसककली मसकलली हे गाणं गायल. सोनम हे गाणं खूप एण्जॉय करताना दिसत आहे. Leo Kalyan ने हा व्हिडिओ त्याच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या कार्यक्रमामध्ये डेकोरेशनपासून ते जेवणापर्यंत सुंदर असे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक पाहुणेमंडळी उपस्थित होते तर त्यांनी तिला खास भेटवस्तूही दिल्या आहेत. सोनमने नुकतेचं एक सुंदर असे फोटोशूट केले आहे. तिने ते फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. तसेच ती लंडनमध्ये तिचा पती आनंद आहुजाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा