Sonam Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Sonam Kapoor : सोनम कपूर लग्नाच्या चार वर्षानंतर झाली आई, दिला मुलाला जन्म

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. नीतू कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, अभिनेत्रीने शनिवारी, 20 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला.

नीतू कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की आता आपले जीवन कायमचे पूर्णपणे बदलणार आहे. सोनम आणि आनंद.

सोनम कपूरने या वर्षी मार्चमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. जून महिन्यात सोनम कपूरने इटलीमध्ये डोहाळेजेवण साजरे केले होते. ज्यात तिच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. यानंतर मुंबईत त्याच्या बेबी शॉवरचेही नियोजन करण्यात आले होते, मात्र ते कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा