मनोरंजन

सोनम कपूर लवकरच होणार आहे आई, बेबी बम्पचा फोटो शेअर करत दिली गोड बातमी

Published by : Team Lokshahi

प्रसिध्द अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. सोनम कपूरने तिच्या नवरा आनंद अहुजा (Anand Ahuja) सोबत इन्स्टाग्रामवर (Instagram) फोटो शेअर करत ही गुड न्युज दिली आहे. सोनम कपूरने फोटो शेअर करत कॅप्शन (Caption) मध्ये लिहीले कि 'आमचे चार हात तुला उचलायला आतुर आहेत. प्रत्येक टप्प्यावर दोन हृदये तुमच्या सोबत आहेत. आम्ही तुझे स्वागत करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.


या बातमीने अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) आणि त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोनमचे आणि आनंद अहुजाचे लग्न २०१८ साली झाले होते. या लग्नाला बॉलिवुडचे (Bollywood) सगळे सेलिब्रिटी (Celebrity) उपस्थित होते. आता तिच्या गोड बातमीमुळे अनेकांना आनंद झाला आहे.
सोनमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सोशल मीडियावर खूप आनंदी दिसत आहेत. या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या छोट्या पाहुण्याला अंशुला कपूर, खुशी कपूर (Khushi Kapoor) , करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी सोनम आणि आनंद आहुजा यांना शुभेच्छा दिल्या. हा आनंद ऐकून सोनम कपूरचे चाहतेही खूश झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा