मनोरंजन

'जुनं फर्निचर' चित्रपटातील 'काय चुकले सांग ना ?’ गाणे प्रदर्शित

या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतानाच आता 'जुनं फर्निचर' मधील खूप सुंदर, भावपूर्ण गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

''सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत, यतिन जाधव निर्मित 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतानाच आता 'जुनं फर्निचर' मधील खूप सुंदर, भावपूर्ण गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'काय चुकले सांग ना ?' असे या गाण्याचे बोल असून यांनी वैभव जोशी हे गाणे शब्दबद्ध केले असून डीएच हार्मोनी एसआरएम एलियन यांनी संगीत संयोजन केले आहे.

या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला खुद्द महेश मांजरेकर यांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

गाण्याबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, '' या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून मनाचा ठाव घेणारे हे गाणे आहे. हे गाणे मला गायला मिळाले, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मनातील घालमेल आणि मनाला मिळणारी उभारी अशा दोन्ही भावना या गाण्यात आहेत. हे गाणे म्हणजे चित्रपटाचा कणा आहे. चित्रपटाची कथा पुढे नेणाऱ्या या गाण्याला संगीत टीमही तितक्याच ताकदीची लाभली आहे.''

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा