Sonu Sood Lokshahi Team
मनोरंजन

सोनू धावला सोनूच्या मदतीला....

आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत सोनुने दिली माहिती....

Published by : prashantpawar1

कोरोना महामारीच्या काळात हजारोंचा मसिहा बनलेला बॉलिवूड(Bollywood)अभिनेता सोनू सूद(Sonu Sood) सध्या बिहारच्या सोनू नाव असणाऱ्या मुलाच्या मदतीला धावून आला आहे. सोनूने 11 वर्षाच्या सोनूला शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. ज्याची माहिती त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये सोनू सूद यांनी असेही सांगितले आहे की, सोनूने केवळ मुलाला शाळेत प्रवेश दिला नाही तर वसतिगृहाची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली आहे. सोनूच्या या मदतीने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली असून लोक त्याच्या ट्विटवर कमेंट करत त्याचे कौतुक करत आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार १४ मे रोजी बिहारच्या नालंदा येथे पोहोचले होते. पत्नी दिवंगत मंजू सिन्हा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री कल्याण बिघा गावात पोहोचले होते. यादरम्यान कल्याण बिघा येथील सुधारित माध्यमिक विद्यालयात जनसंवाद कार्यक्रमात ते लोकांच्या समस्या ऐकत होते. त्यावेळी 11 वर्षाचा सोनू कुमारही मुख्यमंत्र्यांकडे चांगल्या शिक्षणाची मागणी करत आपले म्हणणे घेऊन तेथे पोहोचला होता. सोनूने असेही सांगितले की, त्याचे वडील दारू पितात त्यात सगळे पैसे संपतात आणि शिकवून जे थोडे पैसे मिळतात तेही तो घेतो. सोनूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा