मनोरंजन

Sonu Nigam Corona | सोनू निगम, पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण

Published by : Lokshahi News

कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. राजकारण क्षेत्रात आणि आता बॉलिवूडला देखिल कोरोनाने विळखा घातला आहे. आता बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. सोनू निगमसोबत त्याची पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह आहे.

सोनू निगमने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. सोनू निगमने सांगितले की, 'मी यावेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला भुवनेश्वरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आणि सुपर सिंगर सीझन 3चे शूटिंग करण्यासाठी भारतात यावे लागले होते. म्हणूनच माझी चाचणी देखील झाली आणि त्यात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझी पुन्हा चाचणी झाली आणि पुन्हा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.' यासोबतच सोनू निगम म्हणाला की, मला वाटतं लोकांना कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावं लागेल. मी व्हायरल इन्फेक्शन आणि गळा खराब असताना मैफिली देखील केल्या आहेत. आणि त्यापेक्षा हे बरेच चांगले आहे.

मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, पण मी काही मरणार नाही. माझाही घसा ठीक आहे. पण माझ्यामुळे ज्यांना त्रास झाला त्यांच्याबद्दल मला वाईट वाटते.' दीड महिन्यांपासून तो आपल्या मुलाला भेटलेला नाही, त्यामुळे तो आपल्या मुलाला भेटण्यासाठी दुबईला आला आहे. पण, आता तो आपल्या मुलासोबत जास्त वेळ घालवू शकतो, असेही सोनूने सांगितले. असे देखिल तो म्हणाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा