मनोरंजन

'हा' अभिनेता भूमिका साकारण्यासाठी तब्बल 12 दिवस झोपला नाही

साऊथ इंडस्ट्रीचा (South Industry) सध्या सर्वत्रच दबदबा आहे. अनेक वेळा साऊथ स्टार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी काही गोष्टी स्वतः करतात.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

साऊथ इंडस्ट्रीचा (South Industry) सध्या सर्वत्रच दबदबा आहे. अनेक वेळा साऊथ स्टार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी काही गोष्टी स्वतः करतात. यातच साऊथ अभिनेता शाम (Sham) यांचेही नाव येते. हे नाव जास्त परिचित नसले तरी त्यांच्या कामाबाबत साऊथच्या अबालवृध्दांना माहिती आहे. शाम यांचे खरे नाव शमशुद्दीन इब्राहिम असे आहे.

सामान्य माणूस जर 12 दिवस झोपला नाहीतर त्याचे आरोग्य बिघडते. परंतु, शाम यांनी 12 दिवस जागरण करुन आपले काम पूर्ण केले. ही गोष्ट आहे 2013 सालच्या '6' या चित्रपटाची. क्राईम-थ्रिलरवर आधारीत असलेल्या या चित्रपटात शाम यांनी मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटात त्यांनी तब्बल 6 वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. एकाच अभिनेत्याला सहा वेगवेगळ्या भूमिका निभावणे अत्यंत कठीण असते.

'6' या चित्रपटातील एक भूमिका निभावण्यासाठी शाम तब्बल 12 दिवस झोपले नव्हते. जेव्हा ते सेटवर आले. तेव्हा सर्वच जण त्यांना पाहून आश्चर्यचकीत झाले होते. कारण त्यांचे डोळे पूर्णपणे सुजले होते. त्यांनी मेकअप केला आहे, असे सर्वांना वाटले. परंतु, शाम यांनी 12 दिवस न झोपल्याचे सांगितले असता सर्वांनाच शॉक बसला. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तो सीन पूर्ण करुन तातडीने शाम यांना घरी जाऊन पूर्ण झोप घेण्यास सांगितले. एका मुलाखतीदरम्यान शाम यांनी रजनीकांत आणि कमल हसन यांच्यापासून प्रेरित होऊन हे केल्याचे सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?