3 जून 2013 रोजी जियाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र जियाची आई रबिया यांनी सूरज पांचोलीनं जियाचा खून केला, असा आरोप केला. आज या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात निकाल येणार आहे.
जियाची आई राबिया खानने मुंबई उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली होती. जियाच्या आईने सूरजविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जियाने सहा पानी सूसाईड नोट लिहिली होती. यात तिने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते.
अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.