Priyanka Chopra Team Lokshahi
मनोरंजन

Priyanka Chopra : प्रियांकाची आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

प्रियांका आणि निक जोनस हे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही सोशल मिडियावर कायमच सक्रीय असते. प्रियांका आणि निक जोनस हे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. याबद्दलची माहितीही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. बाळाची गुडन्यूज दिल्यानंतर तिची एक झलक केव्हा पाहायला मिळणार यांबद्दलची सर्वत्र चर्चा होत होती. मात्र प्रियांकाच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्या मुलीची एक झलक पाहायला मिळाली आहे. प्रियांका चोप्राने तिची आई मधू चोप्रा (Madhu Chopra) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट विशेष चर्चेत आहे. कारण या फोटोमध्ये तिच्या मुलीची एक झलक पाहायला मिळते आहे.

प्रियांकाने तिच्या आईसाठी इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त प्रियांकाने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका, मधु चोप्रा आणि छोटी मालतीही (Malti) दिसत आहे. मात्र या फोटोत मालतीचा चेहरा दिसत नाही. हा फोटो (Photo) शेअर करताना प्रियांकाने लिहिल की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तुझ्या आयुष्यातील उत्साह आणि त्यातील अनुभवाने मला खूप प्रेरणा मिळते. तुझी सोलो युरोप ट्रिप हे आतापर्यंतच्या वाढदिवसातील सर्वोत्तम सेलिब्रेशनपैकी एक होते. लव्ह यू टू मून अँड बॅक टू नानी.”

प्रियांका बॉलिवूडमध्ये कधी येणार असा प्रश्न तिच्या चाहत्यावर्गाला पडला आहे. तसेच प्रियांकाचे चाहते तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' (Jee Le Zaraa) या चित्रपटामधून प्रियांका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रियांकाबरोबर कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्टसुद्धा (Alia Bhatt) दिसणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा