Spruha Joshi Team Lokshahi
मनोरंजन

Spruha Joshi : तगडी स्टारकास्ट असलेल्या "मीडियम स्पाइसी" मध्ये दिसणार स्पृहा जोशी

"मीडियम स्पाइसी" चित्रपटाच्या ट्रेलर मधून जेष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग बऱ्याच काळाने मराठी चित्रपटात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होते

Published by : shamal ghanekar

"मीडियम स्पाइसी" चित्रपटाच्या ट्रेलर मधून जेष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग बऱ्याच काळाने मराठी चित्रपटात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होते आणि आता चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर (Social Media) जाहीर केल्याप्रमाणे स्पृहा जोशीच्या अभिनयाचा फ्लेवर रसिकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. 'आशयघन' चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी नव्या पिढीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे स्पृहा जोशी (Spruha Joshi). चित्रपट, रंगभूमी आणि टेलिव्हिजनवर लीलया वावरणारी आणि अभिनयाबरोबरच लेखन, सूत्रसंचालन, कविता या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करणारी स्पृहा "मीडियम स्पाइसी"मध्ये (Medium Spicy) कृष्णा नावाच्या एका छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कृष्णा नक्की कोण आहे? याचा अजून खुलासा झालेला नसला तरी जेवणाच्या थाळीत विविध फ्लेवर्स असल्यावर जसे जेवण परिपूर्ण होते तसेच स्पृहा जोशीच्या कृष्णा या पात्राच्या फ्लेवरमुळे "मीडियम स्पाइसी" चित्रपटातील पात्रांच्या विविध फ्लेवर्सने सजलेली लज्जतदार थाळी परिपूर्ण होणार आहे.

Spruha Joshi

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या तरुण कलाकारांसह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलेलया "मीडियम स्पाइसी" ची लज्जतदार डिश १७ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी