Squid Game season 2  Team Lokshahi
मनोरंजन

Squid Game season 2 : चाहत्यांसाठी गुडन्यूज! 'स्किड गेम'च्या सीझन 2 ची घोषणा

भारतीय प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालणारी कोरियन वेब सीरिज आणि कोरियन ड्रामा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Published by : shamal ghanekar

भारतीय प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालणारी कोरियन वेब सीरिज आणि कोरियन ड्रामा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बेव सीरिज भारतातचं नाही तर जगभरात प्रचंड गाजत आहे. या वेब सीरिजने चाहत्यांना प्रचंड वेड लावलं आहे. आता नेटफ्लिक्सच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे 2021 मधील लोकप्रिय वेब सीरिज 'स्किड गेम'च्या सिझन 2 (Squid Game Season 2) ची घोषणा करण्यात आली आहे. 'स्किड गेम'च्या सीझन 2 च्या घोषणेनंतर चाहते खूप उत्सुक आहेत. ट्विटर करण्यात आलेली पोस्ट पाहून प्रेक्षक खूप आतुरतेने या वेब सीरिजची वाट पाहत आहेत.

'स्किड गेम' या कोरियन वेब सीरिजने जगभरात प्रचंड दबदबा निर्माण केला आहे. आता चाहते दुसऱ्या सिझनची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सने 'स्किड गेम'च्या सिझन 2 ची घोषणा केली गेली आहे. याबद्दलची अधिकृत माहिती त्यांनी नेटफ्लिसच्या ट्विटर अकाऊंटवरून 'स्किड गेम'च्या सिझन 2 चा टीझर शेअर केला आहे.

या वेब सीरिजचा सिझन 2 चा टीझर नेटफ्लिक्सने (Netflix) ट्विटवर केला आहे. आणि त्याबरोबर त्यांनी काही माहिती आपल्यासह एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वेब सीरिजचे दिग्दर्शक यांनी चाहत्यासाठी एक खास संदेश दिला आहे. दिग्दर्शक ह्वांग डोंग ह्युक म्हणाले की, 'गेल्या वर्षी 'स्किड गेम'चा पहिला सीझन प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला 12 वर्षे लागली. पण स्क्विड गेम्स हा फक्त 12 दिवसांमध्ये नेटफ्लिक्सवर लोकप्रिय वेब सीरिज बनली आहे. तसेच पुढे लिहिले की, 'स्किड गेम' पाहिल्याबद्दल आणि ती तुम्हाला आवडत आहे त्याबद्दल धन्यवाद. 'स्किड गेम' सीझन 2 पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये दाक्जी (Ddakji) खेळणारा सूट-बूटवाला व्यक्ती पुन्हा दिसेल. यंग-हीचा बॉयफ्रेड दिसेल.'

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?