मनोरंजन

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: प्राची पिसाटच्या आरोपांवर सुदेश म्हशीळकर यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले की,...

प्राची पिसाट आरोप: सुदेश म्हशीळकर यांनी सोशल मीडियावर खुलासा करून मौन सोडले.

Published by : Riddhi Vanne

प्राची पिसाटने प्रसिद्ध दिग्गज अभिनेते सुदेश म्हशीळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. प्राचीने सुदेश मेसेजचे स्क्रिनशॉट काढत ते सोशल मीडिवर शेअर केले होते. या स्क्रिनशॉटमध्ये सुदेश हे प्राचीसोबत फ्लर्ट करत असल्याचे दिसून आले, यामुळे प्राची चांगलीच संतापलेली होती. त्या स्क्रिनशॉटमध्ये असं लिहिलंय की, तुझा नंबर पाठव ना.. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये.. कसली गोड दिसत आहे, असं सुदेश यांनी प्राचीला मेसेज केले होते. या मेसेजवर प्राचीने सुदेश यांना प्रखर उत्तर देत असताना ती म्हणाली की, मला स्क्रिनशॉट पोस्ट करण्याची इच्छा झाली ... तुमच्या बायकोचा नंबर असेलत... ती सुद्धा गोड असेल... बघा जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमत आहे का ते... ही पोस्ट डिलीट करायला कुठून तरी नंबर मिळवशील ना किंवा कॉल करशीलच' त्याबरोबरच प्राचीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते...'याच पार्श्वभूमीवर अभिनेते सुदेश म्हशीळकर यांनी आता मौन सोडले आहे.

सुदेश म्हशीळकर यांनी फेसबुक अंकाउंटवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. तसेच त्यांनी भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची तक्रार देखील दाखल केली आहे. अशी माहितीही सुदेश यांनी दिले आहेत. त्याबरोबरच त्यांनी तक्रारीचा अर्जही जोडला आहे. तक्रारीचा अर्ज सुदेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहितात की," खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.”

त्यासोबत सुदेश यांनी अनेक मुद्दे मांडले आहे,

1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”

तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? — याचा मला पत्ता नाही.

त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे.

आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे — त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”

मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे — ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं 🤣🤣🤣🤣 असं दिसेल.

जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं.

पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे.

लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.

3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”

माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती.ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.

4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”

मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो.

माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो — कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.

5) “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?”

माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.

6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”

‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे — ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात.

त्या आजही आवर्जून आमच्याकडे येता

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chandrashekhar Bawankule PC : 'मतदार यादी बरोबरच, जनतेने काँग्रेसला नाकारलं' , बावनकुळेंची टीका

Sanjay Rauat on Narayan Rane : " 2029 मध्ये कोकणात कोणाचं दुकान बंद होतंय? राऊतांचा नारायण राणेंना टोला

Ajit Pawar News : जळगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षासह शेकडो कार्यकर्तेचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Chinchpokli cha Chintamani 2025 : चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चे फोटो समोर, पाहा खास झलक