मनोरंजन

'सन मराठी'च्या 'काँस्टेबल मंजू' मध्ये झळकणार खऱ्या आयुष्यातील माय आणि जुळ्या लेकींची जोडी

Published by : Dhanshree Shintre

अभिनयाचे बाळकडू जेव्हा घरातूनच मिळतं, तेव्हा आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून कलाकारांची मुलं अभिनयाकडे वळतात. लहानपणापासून आपल्या कलाकार आई-वडिलांमध्ये पाहिलेले अभिनय कौशल्य, सोबतीला त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे मुलांना त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात एक आत्मविश्वास मिळतो. असाच एक प्रवास सुरू झाला आहे, कलाकार मायलेकींचा. कलाकार आई आणि तिच्या दोन जुळ्या मुली अशी ही माय लेकींची जोडी लवकरच मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे.

'सन मराठी'वर 'काँस्टेबल मंजू' ही नवीन मालिका येत्या १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री विद्या सावळे आणि त्यांच्या जुळ्या मुली नेहा आणि निकिता 'मम्मीसाहेब' आणि 'सवी- कवी' या भूमिका साकारणार आहेत. आई आणि तिच्या जुळ्या मुली यांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्याचा योग सन मराठीने जुळवून आणला आहे.

अगोदरच 'काँस्टेबल मंजू' मालिकेची इंटरेस्टिंग झलक पाहून मालिकेच्या टीमने प्रेक्षकांची आतुरता वाढवली आहे आणि त्यात आता या मायलेकींची भर... संदीप जाधव निर्मित 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची अनोखी प्रेम कहाणी नक्की पाहा येत्या १८ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

"नकली शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नांचा चक्काचूर केला"; नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो राहणार बंद

"...तर कांद्याची माळ घालून मोदींचं स्वागत करा"; नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेपूर्वी आमदार रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

IPL 2024 : आता चेन्नई सुपर किंग्जसाठी खतरा! RCB ला 'प्ले ऑफ'मध्ये पोहचवणार '18'; जाणून घ्या या नंबरचं खास कनेक्शन

Kalyan Lok Sabha: मोदींच्या सभेत स्टेजवर स्थान नसल्याने मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा