मनोरंजन

दारूच्या नशेत सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल; स्वत:च सांगितलं सत्य

बॉलीवूड सुपरस्टार सनी देओल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'गदर 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. पण नुकताच सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूड सुपरस्टार सनी देओल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'गदर 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. पण नुकताच सनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये सनी मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत असून त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

सनी देओलचा हा व्हिडिओ एका फॅन पेजवर समोर आला आहे. ज्यामध्ये ऑफ व्हाइट कलरचा शर्ट घातलेला सनी देओल मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये सनी मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. तेवढ्यात त्याला पाहताच एक ऑटोचालक त्याच्याजवळ येतो आणि सनीचा हात धरून त्याला रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करतो. सनी देओलचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. एका युझरने लिहीले की, संपूर्ण बॉलीवूड नशेत आहे.

यानंतर सनीने सोशल मीडियावरुन व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला की, अफवेचा प्रवास इथपर्यंतच होता. सोबतच सनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो मद्यधुंद अवस्थेत दिसत असून त्याच्यासोबत कॅमेरामॅन दिसत आहे. खरंतर सनी देओलचा हा व्हिडिओ त्याच्या आगामी 'सफर' चित्रपटाच्या शूटिंगचा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा