मनोरंजन

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये सनी देओलची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

या चित्रपटात लोकांची आवडती जोडी 'तारा सिंह' आणि 'सकीना' तब्बल 22 वर्षांनंतर चित्रपटाच्या पडद्यावर दिसली.

Published by : Team Lokshahi

'गदर-2' हा सनी देओलच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटात लोकांची आवडती जोडी 'तारा सिंह' आणि 'सकीना' तब्बल 22 वर्षांनंतर चित्रपटाच्या पडद्यावर दिसली. आता बातम्या येत आहेत की बजरंगबलीच्या अवतारात सनी देओल चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की निर्मात्यांना विश्वास आहे की, “हनुमान हे ताकदीचे प्रतीक आहे आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत बजरंगबलीसारखी ताकदवान व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सनी देओलपेक्षा चांगला कोणी नाही. अभिनेत्याने नितेश तिवारीच्या रामायणाचा भाग बनण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे आणि भगवान हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

नुकतेच माता सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्टचे नाव समोर आले होते. मात्र, नंतर या भूमिकेसाठी सई पल्लवीचे नाव फायनल करण्यात आले. मुख्य कलाकारांमध्ये कोण असेल याबाबत निर्मात्यांनी कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. यश देखील या चित्रपटाचा एक भाग असेल, तो जुलै 2024 मध्ये शूटिंगमध्ये सामील होईल. 2025 पर्यंत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक