Sunny Leone Team Lokshahi
मनोरंजन

Sunny Leone घेऊन येत आहे धमाकेदार गाणे, रेमो डिसूजासोबत दिसणार डान्स करताना

सणांचा हंगाम सुरू झाला आहे. यावेळी अभिनेत्री सनी लिओनी धमाकेदार गाणे घेत आहे. तीने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

Published by : shweta walge

सणांचा हंगाम सुरू झाला आहे. यावेळी अभिनेत्री सनी लिओनी धमाकेदार गाणे घेत आहे. तीने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. या गाण्यावर सनी लिओनी रेमो डिसूजासोबत डान्स करताना दिसणार आहे. 'नच बेबी' असे या गाण्याचे नाव आहे. हा म्युझिक व्हिडीओ चाहत्यांच्या मनातील सणाची रंगत अधिक प्रेक्षणीय करेल. सनी लिओनीने नुकतेच गाण्याचे पोस्टर रिलीज केले.

सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. याशिवाय ती तिच्या कामाशी संबंधित अपडेट्सही इथे शेअर करते. अलीकडेच सनी लिओनीने तिच्या आगामी नवीन म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती शेअर केली आहे. सनी लिओनीने या म्युझिक व्हिडिओचे पोस्टर पोस्ट केले आहे. यामध्ये ती आणि रेमो डिसूझा पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहेत. दोघेही डान्स करताना दिसत आहेत.

सनी लिओनीने तिच्या 'नच बेबी' गाण्याचे पोस्टर शेअर करताना एक उत्तम कॅप्शनही लिहिले आहे. तीने लिहिले, 'तुम्हाला हे गाणे खूप आवडेल. हे नवीन गाणे तुमच्यासोबत शेअर करताना अत्यंत अभिमान वाटत आहे. तू नाचायला तयार आहेस बेबी? माझे नवीन सिंगल.... हे गाणे 6 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.

या गाण्याची निर्मिती हितेंद्र कपोपारा यांनी केली आहे. विशेष म्हणजे तिने सनी लिओनीचा आउटफिटही डिझाइन केला आहे. याबद्दल ती म्हणते, 'हा पोशाख बनवणे सोपे नव्हते. मी आणि माझ्या टीमने अनेक दिवसात फॅब्रिक आणि एम्ब्रॉयडरीचे काम पूर्ण केले. पण, जेव्हा सनीने ते घातले तेव्हा आम्हीही थक्क झालो. 'नच बेबी'ला भूमी त्रिवेदी आणि विपिन पटवा यांनी गायले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद