Sunny Leone Team lokshahi
मनोरंजन

Sunny Leone : पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊन मध्ये सनी लिओनी चमकली

सनी लिओनी चा IFFSA च्या रेड कार्पेटवरचा अनोखा अंदाज

Published by : Team Lokshahi

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ या चित्रपटात सनी लिओनीच्या चार्ली स्त्रीच्या भूमिकेला जगभरातून दाद मिळाली. कान्सच्या अभूतपूर्व यशानंतर हा चित्रपट इतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि ज्याने जगभरात सनी च कौतुक झालं. दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सनी लिओनी पुन्हा एकदा "केनेडी" मधून आपली चमक दाखवून गेली आणि प्रेक्षकांना भावली.

सनी लिओनी " केनेडी" च्या प्रीमियरमध्ये दक्षिण आशियाच्या रेड कार्पेटच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये चमकली. सनी चा फॅशनेबल अंदाज सगळ्यांची मन जिंकून गेला. स्टायलिस्ट चांदनी मेहता हिने हा लूक स्टाईल केला होता. रेड कार्पेटवर सनीने पुन्हा एकदा आपल्या मोहक रूपाने प्रेक्षकांना आपलंसं केलं.

दक्षिण आशियातील "केनेडी" च्या प्रीमियरच्यामध्ये सनी ने सगळ्यांची नजर चोरून घेतली. अलीकडील " मेरा पिया घर आया 2.0" इंटरनेटवर धुमाकूळ घालत असताना "कोटेशन गँग" या तिच्या नवीन चित्रपटाने ती तमिळ चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा