Sunny Leone Team Lokshahi
मनोरंजन

Sunny Leone : सनीला सतवत आहे 'ही' मोठी गोष्ट

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी पॉर्न स्टार होती.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी पॉर्न स्टार (Porn star) होती. पण तीने काही वर्षापूर्वी तो व्यवसाय सोडला. पण एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ त्याच्या भविष्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव टाकतो. भूतकाळ चांगला नसेल, तर भविष्याशी संबंधित चिंता सतावू लागतात. असंच काहीसं सनी लिओनीसोबत घडतंय. तिला तिच्या भूतकाळाबद्दल (past) काळजी वाटते. याचे कारण तीची मुले.

मुलांना सत्य कळेल का?

सनी लिओनला भीती वाटते की तिच्या जुन्या व्यवसायाबद्दल तिच्या मुलांना माहीती पडल तर तिची मुले तिचा गैरसमज करू शकतात. सनीला वाटते की मुलांना तीचा भूतकाळ आवडणार नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखीतीत सनी लिओनीने हे सर्व सांगितले. ती म्हणाली, 'माझ्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मुलांना मोठ झाल्यावर आवडणार नाहीत. आपल्या सर्वांना माहित आहे की ते काय आहे?

सनी पुढे म्हणाली, 'मी माझे निर्णय स्वतः घेते आणि गोष्टी स्वतः ठरवते. माझ्या मुलांना हे देखील माहित असले पाहिजे की ते देखील त्यांच्या स्वतःच्या निवडी करू शकतात. जसे माझ्या एका मुलाला अग्निशामक (Firefighter) व्हायचे आहे. सनीने सांगितले की, तिने तिचे आयुष्य निवडले, त्याचप्रमाणे तिची मुले देखील त्यांच्या इच्छेनुसार निवडण्यास स्वतंत्र आहेत.

सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. तीने मुलगी निशाला दत्तक घेतल आहे. तीला दोन जुळे मुल आहेत. सनी अनेकदा तिच्या मुलांसोबत फोटो शेअर करताना दिसते. ती लवकरच 'Oh my ghost' या चित्रपटात दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा